मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी १ हजार १३१ ने वाढून तो ७५ हजारांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३२६ ने वाढून २२ हजार ८३४ वर बंद झाला. आयसीआयसीआय बँक, एल अँड टी आणि एम अँड एम कंपनीचे आणि जागतिक कंपन्यांचे समभागांची खरेदी मोठी झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे भाव गडगडले आहेत. अन्य देशांच्या चलनाच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाला आहे. त्याचा परिणाम शेअर बाजरावर झाला आहे. शेअर बाजारातील सुमारे २ हजार ८१५ समभागांचे मूल्य वाढले. १ हजार १२१ समभागांचे घसरले तर १२३ समभागांचे मूल्य जैसे थेच राहिले. झोमॅटोचे समभाग सात टक्के वाढले. त्या पाठोपाठ आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, लार्सन अँड ट्रुब्रो, एशियन पेंट्स, टायटन, कोटक महिंद्रा बींक आणि स्टेट बँकेचे समभाग वाढले.
Fans
Followers